Send us a text
दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र, गुरू विश्वामित्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, मंत्रीगण आणि अयोध्यावासी शरयू नदी किनारी जमले. वीर हनुमान शांतपणे बसून रामनाम जपत होते.
प्रभू रामचंद्रांनी जड अंतःकरणाने धनुष्य उचलले. गुरू विश्वामित्र यांच्या परवानगीने परम भक्त हनुमानावर बाण सोडला.
रामबाण तर सुटला, परंतु त्याच क्षणी काही अद्भुत घडले. . रामबाण हनुमानाजवळ पोहोचला परंतु रामनामाच्या अभेद्य कवचला भेदू न शकल्याने तो निष्प्रभ होऊन रामचंद्रांकडे परतला.