Send us a text
काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा...
काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.
" सखे "...
ही फार सुरेख कविता माझ्या पहिल्यांदाच वाचनात आली.
" सखे..
तु दिलेल चांदण
माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे.."
आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.....!
कुसुमाग्रजांच्या" सखे " या कवितेनी सुरू झालेली ही डायरी माझी सखी झाली आहे... !