राजा रविवर्मा सुगंधा बाईंना म्हणाले, "बाईसाहेब, मी एका श्रीमंत घराण्यात, वेदपठण, कथाकीर्तन ऐकत मी वाढलो. त्यामुळं नलदमयंती, हंस-दमयंती, सैरंध्री, द्रौपदी, ही सारी रूपं माझ्या मनात रेंगाळत होती." "पण ती द्रौपदी, ती सीता, ती लक्ष्मी, ती सरस्वती मी आणू कुठून?" "ह्या देवता होण्याचे सामर्थ्य देवानं तुमच्या रूपाला दिलेलं आहे. तुम्ही मला साहाय्य केलं तर, देवतांना साकार करण्याची माझी सारी स्वप्नं साकार होतील."